Sunday, April 10, 2016

Mathy Date.. Extended....


आज हजेरी घेताना मी मुलानां नेहमी प्रमाणे दिनांक विचारली... आणि पट्कन ते ओरडले : ९-४-१६ आणि हे ऐकताच मला ५ दिवस आधीची मस्ती आठवली... तारखेबरोबर...
बघा तुम्हाला पण काही जाणवते का? म्हणून मी फळ्यावर ९-४-१६ ही तारीख लिहून मुलानां विचारलं.. "मला ह्या तारखेत एक गमत दिसते.. बघा तुम्हाला पन दिसते का?" सगळ्यांचे डोळे फळ्याकडे वळ्ले आणि काही क्षणात.. सर... मला पन दिसले... ९ x ४ = २० + १६ = ३६ तिने मला स्तब्ध केले.. कारण मी २०१६ चे २० लिहिले नव्हते.. तेवढ्यात अजून एक हात वर घेला.. "सर... मला काही वेगळे सापडले.. "
मला वाटले की आता मला जे पाहिजे ते उत्तर त्याच्याकडून येणार.. पण.. " सर.. ९ x (४-२) = १८-२ = १६ " झटका बसला ना तुम्हाला पण? 😀 पिच्चर अजून संपले नव्हते.. 'सर.. मला अजून काही दिसले.. " "९ ही विषम संख्या आहे, ४ ही सम आहे, परत १ ही विषम आहे आणि ६ ही सम आहे.. विषम, सम, विषम, सम.. " फक्त मझेच नाही तर सर्व मुलांचे डोळे चमकले.. पण मला जे ऐकायचे होतं ते अजून मात्र मिळाले नव्हते.. 😌 वर्ग थोडा शांत झाला.. म्हणून मीच उडी मारली.. " ९, ४, १६ ह्या संख्या बघून कशाची आठवण नाही येत?" शांतता.. " ओके.. मला सांगा ९ कशाच्या पाढ्यात येतो?" " तीन त्रिक नऊ.. " " बरोबर.. मग तसच ४..." माझं प्रश्न अजून पूर्ण झालच नव्ह्तं की त्यापैकी एक... " सर सर... मला समजलं... ३x३=९, २x२=४, ४x४=१६.. " हे संगता-संगता ती उत्साहाने मागून धावत फळ्याकडे पोहोचली.. तिच्या चेहऱ्यावर एक संतोष व आनंद सहज दिसत होता .. जे बघ्ण्यासाठी एक गणित शिक्षक सदैव तत्पर असला पाहिजे... " माहित आहे अशा संख्यांना काय म्हणतात?" शांतता.. " वर्ग संख्या ऐकलं आहे?" "हो सर... ज्या संख्याला त्याच संख्येने गुणून जी संख्या येते तीला वर्ग संख्या म्हण्तात.. म्हण्जे.. ४, ९, १६ ह्या वर्ग संख्या आहेत.. " वर्ग संख्याची ही व्याख्या जरी बरोबर असली तरी ती आता माझ्या सहावी च्या मुलानां आवड्णार नाही ह्याच मला खात्री आहे आणि त्याचे मला थोडे गर्व ही आहे... (का बरं?) पण एखाद्या दिनांक मध्ये हे "शोध" लावून ह्या पाचवी च्या मुलांचा चेहरा मात्र खिलला होता !
आणि सध्या, माझ्यासाठी एवढं पुरेसं होतं...  बरोबर ना ? :-)
रूपेश गेसोता


No comments:

Post a Comment